१७ वर्षाच्या नातवानेच केला आजीचा खून
दहिवडी: माण तालुक्यातील मार्डी येथे आईला व बहिणीला त्रास देणाऱ्या आजी हिराबाई मोटे हिच्या डोक्यात दगड घालून अल्पवयीन नातू स्वप्नील मोटे(वय१७)याने खून केल्याचे उघड झाले असून येडेनिपाणी येथील पुजारी आनंदा तांदळे यांना देखील दहिवडी पोलिसांनी अटक केली आहे.आईला आणि बहिणीचा छळ करून उपाशी ठेवत होती आजी.
एके दिवशी अल्पवयीन नातू स्वप्नील मोटे याने ठरवले आजीचा काटा काढायचा. त्यासाठी नातू येडेनिपाणी(ता. वाळवा जि. सांगली )येथील देवरुषी पुजारी आनंदा दत्तात्रय तांदळे यांच्याकडे गेला आणि विचारले आजीचा खून करायचा आहे काय करावे लागेल त्यावेळी पुजाराने सांगितले खून करताना एकट्याने जायचे सोबत कोणालाही बरोबर घ्यायचे नाही नाहीतर पोलिसांना समजते. पुजाराने सांगितल्याप्रमाणे नातू स्वप्नील मोटे याने मध्यरात्री आजीची म्हैस सोडून दिली आणि म्हैस शोधण्यासाठी आजी घरामागे आली असताना त्याने आजीच्या डोक्यात बॅट मारून खाली पाडले आणि डोकयात दगड घालून खून केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्नील मोटे पुजाऱ्याकडे गेला आणि सगळा प्रकार सांगितला व म्हणाला देवाला कौल लावा पोलिसांना माझा संशय येईल का त्यावेळी पुजाराने कौल लावला आणि सांगितले आता उजवा कौल दिला आहे. तु केलेला प्रकार पोलिसांना समजणार नाही. तु आता बिनधास्त राहा परंतु दहिवडी पोलिस ठाणेचे सपोनि दत्तात्रय दराडे यांनी तांत्रिक बाबी तपासून हालचाली ओळखून अल्पवयीन नातू स्वप्नील मोटे याला ताब्यात घेतल्यानंन्तर त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि खुनाची कबुली दिली. त्यामध्ये पुजारी आनंदा तांदळे याला अटक केली असून पुढील तपास पोलीस अधीक्षक तुषार दोषी व व उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय दराडे करत आहेत.
सपोनि. दत्तात्रय दराडे यांची आदर्श कामगिरी..
सदर खून प्रकरणातील आरोपी शोधण्यासाठी सपोनि. दत्तात्रय दराडे यांनी तांत्रिक बाबी तपासून व इतर माहितीच्या आधारे घटना घडल्यापासून २ दिवसाच्या आत आरोपीना अटक करून आदर्श कामगिरी केली आहे.
