पीएमापी बस मधील महिला बनल्या चोरांचे लक्ष्य; तब्बल 1.4 लाखांची केली चोरी
पुणे: पुण्यात अनेक ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत. त्यातच आता पीएमपी बस मधील महिला या आता चोरांचे लक्ष्य बनल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या महिला बळी पडत आहेत. 17 सप्टेंबर रोजी एक 65 वर्षीय महिला पीएमपी बसमधून प्रवास करत असताना तिच्या गळ्यातील 1.4 लाखाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना घडली. बस मध्ये असणाऱ्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंगळसूत्र हिसकावून घेतले. ही घटना आळंदी देवाची आणि कुमार पॅसीफिक मॉल या दरम्यान असणाऱ्या मार्गावर दुपारी 2 च्या सुमारास घडली. ज्या महिलेचे मंगळसूत्र चोरीला गेले आहे ती मुळशी तालुक्यातील भडस गावातील रहिवासी आहे. घटनेनंतर सदर महिलेने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञात गुन्हेगाराविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे.या घटनेचा तपास कॉनस्टेबल दुदाम करत असून पोलिसांनी प्रवाशांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
