महत्त्वाच्या बातम्या

 कृषी अधिकाऱ्याला लाच घेताना साताऱ्यात रंगेहात अटक

 

सातारा — लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) सातारा पथकाने  कृषी विभागातील अधिकाऱ्याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

तक्रारदाराने  कृषी अधिकारी  लाच मागत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारदाराची कृषी संबंधित कंपनी असून, त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्ता तपासणी अहवालात अनुकूलता दाखवण्यासाठी सुरुवातीला ६० हजार रुपयांची अधिकाऱ्याने मागणी केली होती.  तडजोडीनंतर ही रक्कम ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली.  तक्रारदाराने  याबाबत एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर सापळा रचून (दि. 23 मार्च 2026)   रोजी युवराज अर्वा काटे (वय ४५), कृषी अधिकारी (गुणनियंत्रण), तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना  तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने रंगेहात पकडले.  

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुषमा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील करत आहेत. आरोपीविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!