बाल संत अभिनव अरोराला लॉरेन्स गॅंग कडून जीवे मारण्याची धमकी
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर बिष्णोई लॉरेन्स गँगकडून वारंवार कोणालाही जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकीला देखील मारण्याची धमकी दिली. पूर्णिया संसदेच्या पप्पू यादव यांना धमकी आली आणि आता युट्यूब वर प्रसिद्ध असणाऱ्या अभिनव अरोडाला देखील लॉरेन्स गॅंगने धमकी दिली आहे. अभिनवच्या आई ज्योती यांनी सांगितले की लॉरेन्स गॅंग कडून त्यांना धमकी मिळाली. लॉरेन्स बिश्नोई गॅंग कडून त्यांना फोन आला होता. त्यांनी फोन उचलला नाही. त्या नंतर त्यांना मेसेज आला आणि मेसेज मध्ये अभिनव अरोराला जीवे मारण्याची धमकी मिळाली.
अभिनव हा कथा वाचक आहे. तो रील बनवतो. परंतु अभिनव ने हिंदू धर्माचा मजाक बनवू नये अशी वॉर्निंग त्याला लॉरेन्स गॅंग ने दिली आहे.अभिनव हा लॉरेन्सच्या टार्गेटवर आहे. तो खूप काळापासून सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे तो एक युट्यूबर आहे. त्याला एक एंल्फूएन्सर व भक्ताच्या रूपात ओळखले जाते. त्याचे इंस्टाग्राम वर नऊ लाखापेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. तो बालसंताच्या रुपात प्रसिद्ध आहे. त्याचे वय केवळ दहा वर्ष आहे. तो स्वतःला भगवान श्रीकृष्णाचा भक्त सांगतो व श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम मानतो. श्रीकृष्णा सोबत रामाची भक्ती देखील करतो. तो सोशल मीडियावर अध्यात्मिक व्हिडिओ पोस्ट करत असतो.परंतु लॉरेन्स गॅंग ने त्याला जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज केला आहे.
अभिनवच्या परिवाराने मथुरेत याविरुद्ध केस दाखल केली आहे.अभिनवच्या कुटुंबीयांनी सात युट्युबर्स वर वरती देखील त्रास देतात अशी तक्रार दाखल केली आहे. लॉरेन्स गॅंगवर धमकी देण्याचा आरोप केला असून पोलिसांनी आम्हाला सुरक्षितता द्यावी असे त्यांचेे म्हणणे आहे.
