महत्त्वाच्या बातम्या

राजेंद्र विद्यालय, खंडाळा संघाची खो खो स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

      राजेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, खंडाळा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय खो खो स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या संघाने सांगली जिल्ह्याच्या संघावर मात करून कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांक पटकावला व संघाची डेरवण  जिल्हा रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

       सर्व विजयी संघातील सहभागी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व क्रीडा शिक्षक डी. जी. गाढवे, व्हि.एन.गाढवे, महेंद्र गाढवे, व्हि. एस. राऊत, सौ.येवले, धर्माधिकारी, विवेक तळेकर, प्रशिक्षक दिग्विजय खंडागळे, विनोद खंडागळे, आकाश लिमन,  श्री. अनिकेत गाढवे यांचे संस्थेचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव अनिरुद्ध दादा गाढवे, संस्थेचे सर्व संचालक,प्राचार्य श्शब्बीर नालबंद,उपप्राचार्य अरूंधती गाढवे, उपमुख्याध्यापक सुशिला मोहिते, पर्यवेक्षक धनंजय महामुनी,ग्रंथपाल हणमंत यादव, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच खंडाळा नगरीतील सर्व क्रीडा प्रेमी, ग्रामस्थ यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!