पोवई नाका परिसरातील खंडित झालेला विदयुतपुरवठा सुरळीत करण्यात महावितरण विभागाचे यश
सातारा शहर पोवईनाका परिसरात संध्याकाळी अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे दूरचित्रवाणीवर मतदानाच्या बातम्यांचा आस्वाद घेणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला. सदर बाजार उपकेंद्र येथे बिघाड झाल्याने ही परिसरात विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता महावितरणचे अधिकारी बेडेकर, पोवई नाका शाखा नंबर १, सहाय्यक अभियंता सौ. वैशाली पारवे तसेच प्रधान तंत्रज्ञ आनंदराज ओव्हाळ, श्री बोडके वरिष्ठ तंत्रज्ञ, धनंजय पवार, गणेश माने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये बिघाड शोधून विद्युत पुरवठा पूर्ववत केला. सदर काम विक्रमी वेळात पूर्ण करून एक तासाच्या आत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यशस्वी झाले.
