पायी जाणाऱ्या इसमांना घातला दुचाकीस्वारांनी गंडा
पुणे परिसरातील चव्हाण हॉस्पिटल, स्वारगेट येथून पायी जाणाऱ्या दोन इसमांना दुचाकीस्वारांनी गंडा घातल्याची घटना समोर येत असून ही घटना खडक पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.
दुचाकीस्वारांनी पायी जाणाऱ्या इसमांच्या जवळील दोन मोबाइल जबरदस्ती हिसकावून नेले आहेत. याप्रकरणी फिर्यादींनी खडक पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल कदम हे करीत आहेत.
