महत्त्वाच्या बातम्या

सौ देवीबाई छाबडा ग्रामीण शिक्षण संस्था,  येथे सायगाव बीटच्या यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा संपन्न

       आपल्या दैनंदिन जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे.खेळामुळे विध्यार्थ्यांची शारीरिक ऊर्जा वाढत जाऊन बुद्धिमतेत देखील वाढ होत असते. खेळांचा भविष्यात विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होत असतो. त्यामुळे शारीरिक क्षमता वाढवणाऱ्या स्पर्धेत जास्तीत जास्त विध्यार्थ्यानी सहभाग घेण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन सायगावं बिटचे भाग विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे यांनी केले
        रायगाव ता. जावळी येथील सौ देवीबाई छाबडा ग्रामीण शिक्षण संस्था,  येथे सायगाव बीटच्या यशवंतराव चव्हाण बालक्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. यावेळी धावणे, थाळीफेक, गोळाफेक, लांबउडी, लंगडी, बुद्धिबळ, योगासने इत्यादी विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा सपन्न झाल्या. 
        विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली.स्पर्धेचे उद्घाटन छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. घनश्याम छाबडा यांच्या उपस्थितीत सायगाव बीटचे भाग शिक्षण विस्ताराधिकारी श्री.चंद्रकांत कर्णे यांच्या हस्ते संपन्न झाले. आनेवाडी केंद्राच्या वतीने तसेच छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.
       यावेळी छाबडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष घनश्याम छाबडा खेळाडूंना शुभेच्छा  देताना म्हणाले , जावळी शिक्षण विभागातील विविध उपक्रमांना आवश्यक ते सहकार्य संस्थेच्या वतीने केले जाईल. तसेच
स्पर्धेच्या निमित्ताने संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी आनेवाडी, महिगाव, भनंग केंद्राचे केंद्रप्रमुख उस्मान मनेर, सुभाष दुटाळ, मिलन मुळे तसेच सर्व बीट मधील क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!