उड्डाण करताच बावधानमध्ये कोसळलं हेलिकॉप्टर, २ वैमानिकांसह इंजिनिअरचा मृत्यू
पुण्यातील बावधान परिसरात खासगी हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
पुणे शहराच्या परिसरात धुके आहे. या धोक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर हेलिकॉप्टर कोसळले. 2 वैमानिकासह एका इंजिनियरचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
