महत्त्वाच्या बातम्या

नागठाणे महाविद्यालयाचे शिवाजी विद्यापीठ, सातारा विभागीय क्रिडा स्पर्धेत यश

      सातारा येथील श्रीमती मीनलबेन महेता कॉलेज, पाचगणी यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज स्टेडियम येथे क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सातारा विभागीय मैदानी क्रीडा  स्पर्धांमध्ये आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नागठाणे महाविद्यालयातील कु.संयुक्ता साळुंखे हिने 400 मी धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला तर कु. अनुष्का साळुंखे हिने बांबू उडी या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळविला. त्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आंतर विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

     त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ.महेश गायकवाड व जिमखाना विभागातील सदस्य डॉ.राजाराम कांबळे, प्रा संतोष निलाखे, प्रा.अभिलाषा देशमुख  क्रिडा संचालक डॉ.लक्ष्मण दोडमणी  महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्या दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!