विवेकाने आनंदी जीवन जगणारा… मी विज्ञानवादी
विज्ञान आणि माझा फारसा संबंध नसला तरीही विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान मला आहे.विज्ञान आपल्या जीवनामध्ये कसे महत्त्वपूर्ण ठरते याची जाणीव आहेच. मानव आज विज्ञानाद्वारे एक वेगळ्या उंचीवर पोचलेला दिसून येतो.मानवाने आज विज्ञानाद्वारे खूप सारे अविष्कार केलेले दिसून येतात. मानवाचा आणि विज्ञानाचा संबंध जरी वाढत असला तरीही आपल्याला काही व्यक्ती विज्ञानाचा आणि विज्ञान विचारधारेचे खंडन करताना दिसून येतो. आज विज्ञान आहे तर मानव आहे. विज्ञानवादाचा हा थेट परिणाम अंधश्रद्धेवर होत असतो. आपल्याला समाजात खूप सारे अनैतिक प्रकार दिसून येतात जे आज समाजासाठी घातक घातक ठरतात.
भारतात खूप सार्या अशा रूढी परंपरा आहेत की, त्या समाजासाठी घातक आहेत. त्या रूढी परंपरांचे खंडन आपले विज्ञानवादी महापुरुष आणि भारतातील संतांनी केले आपल्याला दिसून येते. त्या रूढी परंपरांचे खंडन या भारतातील विज्ञानवादी महापुरुष आणि संतांनी केले असले तरीही आजचा मानव त्याची चिकित्सा करत नाही. त्यामुळे आज मानवाला काल्पनिक गोष्टींमध्ये गुंतून ठेवणारे काही मानव कलंक लोक आहेत. त्या लोकांनी मानवाच्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व न सांगता अध्यात्माचे महत्व सांगितले जे करून एखाद्या विशिष्ट समाजाचे कल्याण होईल. विज्ञानवादाला विरुद्ध म्हणजे आत्ताचे थोतांड,अंधश्रद्धा पसरवणारे लोक. त्यापासून मानवाने अलिप्त राहणे गरजेचे होऊन बसले आहे. यामुळे स्वतःवर अविश्वास, प्रेरणाहीन, आणि निराशांना सामोरे जावे लागते. आपण असे समजूया अध्यात्म म्हणजे हृदय,भावना,नाते, परंपरा रूढी आणि धर्मकार्य आणि विज्ञान म्हणजे मेंदू, विचार, व्यवाहार.
सर्वच मानव कधी आपल्या हृदयाचे ऐकून भावना महत्वाचे मानतो तर कधी आपल्या मेंदूचे म्हणजेच बुद्धीचे ऐकून विचार महत्त्वाचे मानतो. यावेळी मानव त्याच्या विवेक बुद्धीचा उपयोग करून विज्ञानाच्या दृष्टिकोनाने विचार करत असतो त्यावेळी तो खरा विज्ञानवादी असतो. 2500 वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं होते की मानवाला विज्ञानवादी व्हायला पाहिजे.याचा अर्थ गौतम बुद्धांना कोणते विज्ञान अपेक्षित होते मूळ त्या विज्ञानाचा अर्थ तरी काय तर गौतम बुद्धांनी याचा अर्थ सांगितला. ज्ञानाचे कृषीमध्ये रुपांतर करणे याचा अर्थ विज्ञान होय.
आपण शिक्षण व्यवस्थेमधून ज्ञान घेतो जरूर पण त्या ज्ञानाचे विज्ञानामध्ये रूपांतर करतो का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. मिळालेल्या ज्ञानाचा वापर आपल्याला जीवनामध्ये करता येत नसेल तर दुर्दैवाने आपण विज्ञानवादी झालो नाही.ज्या दिवशी या देशात एकही बेरोजगार आणि अंधविश्वासी दिसणार नाही त्यादिवशी खऱ्या अर्थाने आपला देश विज्ञानवादी झाला आहे असे म्हणता येईल. ज्ञानाचे कृतीमध्ये रूपांतर करणे हा देश आपल्याला हवा. आता आपल्याला विज्ञान या शब्दाचे मोल जरी माहित पडले असेल तरी खरा विज्ञानवादी होण्यासाठी आपल्याला विवेक बुद्धीचा वापर व अंधश्रद्धेचे साम्राज्य दूर होण्यासाठी नव्या पिढीने विज्ञानवादी विचार स्वीकारण्याची गरजेचे आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारा….
माणसाशी माणुसकीने वागणारा….
जात धर्म अंधश्रद्धा रूढी परंपरा यांना फाट देऊन स्वइच्छेने विवेकाने आनंदी जीवन जगणारा….
असा मी विज्ञानवादी…..!
लेखन – गणेश नंदकुमार वर्णेकर
छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा
