महत्त्वाच्या बातम्या

कास पठार येथील रेव्ह पार्टीत डोक्यात दारूची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न…5 जणांवर गुन्हा दाखल 

      साताऱ्याचे नंदनवन असलेल्या कास पठारला गालबोट लागले  आहे. या भागात रेव्ह पार्टी च्या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर पोलीस प्रशासन घडबडून जागे झाले आहे. कास पठार वरील हॉटेल जय मल्हार मधे  काल रात्री दारूच्या नशेत  मारामारी झाली. दारूची बाटली डोक्यात फोडल्याने हॉटेल मध्ये राडा झाला. या प्रकरणात 5 जणांवर मेढा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद झाला आहे. 
      पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रतिक बापुराव दळवी (रा. जकातवाडी, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रेयस श्रीधर भोसले, समीर सलीम कच्छी, रोहन जाधव,  सोन्या जाधव, अमर पवार  व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकीव येथील हॉटेल मध्ये रात्री 10 च्या सुमारास मारहाणीचा प्रकार घडला. एकीव येथील जय मल्हार हॉटेल मध्ये प्रतिक दळवी त्याच्या मित्रा समवेत जेवायला गेले होते. त्या हॉटेल मध्ये दारूच्या नशेत काही तरुणी गाण्यावर डान्स करत होत्या.अचानक एका नशेत असणाऱ्या संशयिताने काही कारण नसताना धीरज शेळके यांच्या डोक्यात दारूची बाटली फोडली. प्रतिक दळवी यांनी असे का केले विचारले असता त्यांच्या डोक्यात व पाठीत दारूची बाटली फोडून त्यांना जखमी करण्यात आले. तसेच संशयित व्यक्तीच्या साथीदारांनी प्रतिक दळवीस मारहाणी सोबत शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे घटनास्थळी    पोहचून त्यांनी संबंधित आरोपींना अटक केले आहे. व घटनेचा तपास सुरु आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!