सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निदर्शने
सातारा जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. परभणीच्या हिंसाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करा या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्याल्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील भारतीय राज्यघटनेचे उद्देशिका या प्रतिमेची विटंबना एका माथेफिरुनी केली त्यामुळे परभणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कार्यकर्त्यांमार्फत आंदोलन करण्यात आले. या घटनेच्या निषेध आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या सर्व घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करावी. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे. तसेच त्यांच्या हत्येत सहभागी असणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावे. संबंधितांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ,राजेंद्र होटकर,मंगेश गायकवाड,शेखर आडागळे, नितीन बोताळजी, विशाल भोसले,गणेश चंदनशिवे,शत्रुघ्न आडागळे, मनीषा सोनावणे, सुप्रिया येवले, आशिष सकटे सहभागी झाले होते.
