महत्त्वाच्या बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर पारध्यांचा  संसार

     सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर अनेक दिवसापासून पारध्यांनी संसार थाटले असून प्रशासन या बाबत ढिम्म  आहे. विशेष म्हणजे या भिंतीलगतच  पोलीस चौकी आहे. पारध्यांनी संपूर्ण भिंतीवर कपडे ,पांघरुणे टाकली असून लहान मुले रस्त्यावर अंघोळ करत असतात. अनेक वेळा त्यांची आपआपसात भांडणे होत असतात. या रस्त्यावर कायम वहानांची वर्दळ असते, मुख्य प्रवेशद्वारा जवळ अनेक आंदोलने मोर्चे  सुरू असतात पण पारध्यांनी  जागा बळकावल्यांमुळे आंदोलनकर्तांना  मुख्य रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे.  सदर परिसरास ओंगळवाणे स्वरूप आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालण्याची गरज भासत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!