महत्त्वाच्या बातम्या

कौलाळे गटात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

      जव्हार तालुक्यातील कौलाळे गटात एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तीन जिल्हातील स्पर्धकांनी हजेरी लावली. तर दोन हजार शेतकऱ्यांनी मनसोक्तपणे स्पर्धेचा आनंद लूटला. मागील तीन  वर्षांपासून न्यायालयाने बंदी हटवल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यतीच्या वेगवान गतिला सुरूवात झाली आहे. याचंच औचित्त साधून गेली तीन  वर्षांपासून पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुका पैकी कौलाळे ग्रामपंचायतमधे स्थित असलेल्या गारादेवी मैदानावर रविवारी पुन्हा एकदा शर्यतीचा थरार बघायला भेटला. 

        दरम्यान झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून २९ डिसेंबर रोजी कौलाळे गटात बैलगाडा शर्यत आयोजीत केली होती. यासाठी पालघर, ठाणे व नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी आपली बैल जोडी घेऊन स्पर्धेत हजर झाले होते. यावर्षी एकून ९० बैलगाड्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. त्यात रविवार असल्याने चाकरमान्यांनी देखील आवर्जून उपस्थिती दर्शवली. यात शेतकरी कुटूंबातील लहान मुले, तरूण वर्ग व जेष्ठ नागरीक यांचा देखील मजबूत सहभाग होता. या सर्वांनीच सुट्टीचा दिवस म्हणून शर्यतीचा मनमुराद आस्वाद घेतला. यावर्षी ५०० ते २००० रूपये पर्यंत बक्षिसांची खैरात होती. सबब यंदा प्रचंड दिलखुशपणे शेतकरीवर्ग दिवसभर गारादेवी मैदानावर खिळवून बसला होता. 

     आयोजक एकनाथ दरोडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “स्थानिक बाजारपेठेत बैलांच्या किमतीला योग्य भाव मिळावा तसेच शेतकरी परंपरा जोपासुन जास्तीत जास्त तरूण वर्ग शेती व्यवसायाकडे आकर्षित व्हावा. याचबरोबर लोप होत चाललेल्या ग्रामिण संस्कृतीला प्रोत्साहण देणे महत्वाचे म्हणजे वर्षभर काबाडकष्ट करून थकलेल्या शेतकऱ्यांना वर्षाच्या शेवटी आनंदित  करून वृद्ध बैलांना कत्तलखान्यापासून वाचवणे. हाच आमचा शर्यत आयोजीत करण्याच्या मुख्य उद्देश आहे. यास्तव आम्ही गेली तीन वर्षांपासून पालघर जिल्ह्यात सर्वात मोठी शर्यत आयोजीत करीत आहोत”. असे ही दरोडा यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत शर्यतीचे अध्यक्ष प्रकाश करनोर, उपाध्यक्ष नारायण करनोर, खजिनदार संजय भला सोबत नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश कोरडे व तमाम कार्यकर्ते या शौर्याच्या शर्यतीत गारादेवी मैदानावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!