महत्त्वाच्या बातम्या

नटराज मंदिराजवळील काँक्रिटीकरण पूर्णत्वास

    नृत्य व कलेची देवता म्हणून नटराज ही देवता प्रसिद्ध आहे.या देवतेची संपूर्ण भारतात फक्त दोनच मंदिरे असून एक मंदिर तामिळनाडू मधील चिदंबरम येथे व दुसरे सातारा येथे आहे. या मंदिरात संपूर्ण भारतातून भक्तगण येत असतात. त्यामध्ये विशेषतः दक्षिण भारतीय भक्तांचा तसेच नृत्य कलेमध्ये पारंगत असलेल्या कलाकारांचा समावेश असतो.या मंदिराकडे जाणारा रस्ता हा जिल्हा परिषद हद्दीत असून सदर भाग त्रिशंकु  भागात मोडतो.हा रस्ता कच्चा असल्याने पावसाळ्यात रस्ता वापरणे वाहन चालकांना तसेच भक्तांना कठीण होऊन बसते.

     भक्तांची समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ  यांनी पाठपुरावा करून सदर काम नगरपरिषद कडून मंजूर करून आणले. या कामाचा निधी जिल्हा परिषदेच्या त्रिशंकू भाग विकास या अंतर्गत मंजूर झाला असून  रस्त्याचे काम 31 मीटरचे आहे. या कामासाठी रुपये 414665 खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात दादासाहेब ओवाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सातारा नगरपरिषद हद्द वाढी मध्ये अनेक भागांचा समावेश केल्यामुळे उर्वरित त्रिशंकू भागासाठी शासनाकडून येणारा निधी हा पुरेसा नसल्यामुळे सदर भाग शहराजवळ असून सुद्धा प्राथमिक सुविधांपासूनून वंचित राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!