महत्त्वाच्या बातम्या

कै. सुशिला विठ्ठल निकम यांच्या स्मरणार्थ मतिमंद मुलांसाठी फळ वाटपाचे आयोजन

      आज अतीत गावचे युवा भाजप कार्यकर्ते तसेच शिवछत्रपती प्रतिष्ठान चे कराड उत्तर चे कार्याध्यक्ष सुरज येलवे यांच्या आज्जी कै. सुशिला विठ्ठल निकम यांच्या स्मरणार्थ मतिमंद मुलांसाठी फळ वाटपाचे आयोजन केले होते. त्यांच्या 75 व्या जयंती चे औचित्य साधून  एहसास मतिमंद मुलांचे बालगृह  येथे हा कार्यक्रम पार पडला.     या कार्यक्रमास भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष तसेच शिवछत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष  रवींद्रदादा पवार उपस्थित होते.

     या प्रसंगी भाजप युवा नेते तसेच शिवछत्रपती प्रतिष्ठान चे कराड उत्तर चे अध्यक्ष अजित जाधव, पैलवान युवा नेते ऋषीभाऊ कणसे, युवा उद्योजक निखिल लोखंडे , युवा नेते ऋषी भोसले , युवा उद्योजक अभिजीत बनसोडे, पैलवान प्रफुल्ल कणसे, उद्योजक ओमकार माने, सर्व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!