महत्त्वाच्या बातम्या

ग्रंथ,पुस्तकांच्या वाचनात रमले विद्यार्थी

     खंडाळा येथील सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय, ग्रंथालय विभाग व एकता ग्रंथालय व वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” सप्ताह अंतर्गत ०२ जानेवारी रोजी “ग्रंथ प्रदर्शन” आयोजित करण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन एकता ग्रंथालयाच्या ग्रंथपाल रेश्मा यादव यांच्या हस्ते करण्यात आले. वरिष्ठ महाविद्यालय व राजेंद्र विद्यालय विद्यार्थ्यांनी ललित, वैचारिक, आत्मचरित्र, स्पर्धा परीक्षा, क्रीडा, इ. विषयावरील विविध ग्रंथ व पुस्तकांचे वाचन करत ज्ञानरुपी आकलन केले. या ग्रंथ प्रदर्शनासाठी वरिष्ठ महाविद्यालय ग्रंथपाल अर्चना राऊत,राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. अमीर इनामदार, विद्यार्थी साहिल शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

    यावेळी एकता ग्रंथालय समिती अध्यक्ष जितेंद्र गाढवे,डॉ. प्रतिभा पाटणे, वर्गशिक्षिका योगिता इंगवले, प्रा.भारती चव्हाण, प्रा.काजल पाटील, प्रा. अस्मिता येवले, प्रा. नयना ओंबळे बीसीए, विज्ञान विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!