शिवशक्ती मल्टिस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटीच्या विस्तारित कक्षाचा उदघाटन सोहळा संपन्न
सहकारी क्षेत्रामधे संस्था काढणे सोपे असते मात्र टिकविणे आणि वाढ करणे सर्वात अवघड असते. शिवशक्ती मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीने हे शिवधनुष्य चांगल्या प्रकारे पेलले आहे. ही संस्था अल्पवधीतच नावारूपाला आल्याने ग्रामीण भागातील आर्थिक उलाढाल वाढण्यास या शाखेमुळे मदत होईल. शिवशक्ती सोसायटीने सहकाराच्या माध्यमातून हाती घेतलेले कार्य हे वाखाणण्यासारखे आहे, असे प्रतिपादन जावळी महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मच्छिन्द्र मुळीक यांनी केले.
आनेवाडी ता जावळी येथे शिवशक्ती मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी साताराच्या विस्तारित कक्षाचे उदघाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी संस्थेचे संस्थापक प्रभाकर साबळे, जावली बाजार समितीचे संचालक मनेष फरांदे, शिवशक्ती सोसायटीचे चेअरमन राहुल साबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना साळुंखे,शिवशक्ती पतसंस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक शिवशक्ती सोसायटी सर्व संचालक मंडळ तसेच पंचक्रोशीतील सरपंच मा.सविता शिंगटे, बाळासाहेब कांबळे, हरिचंद्र पवार, हसीना मुजावर, लक्ष्मण घाडगे, दुर्गा भिसे, वैशाली फरांदे,यशवंत महामुलकर,स्वाती कचरे,सीमा जाधव, प्रथमेश साबळे,अलका गोरे, रामचंद्र चव्हाण,सुनील फरांदे, केशव फरांदे,किशोर शहा,सुनील गोरे, यशवंत फरांदे, समाधान गायकवाड, नेट्वीन सिस्टीमचे वसंत फाटक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येयेने उपस्थित होते.
पुढे बोलताना मुळीक म्हणाले,संचालक मंडळाने विश्वासाने दिलेली ही शाखा आपली मानून त्याची प्रगती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत या भागातील लोकं कष्टाळू असून त्यांना अश्या शाखेची गरज आहे. ठेवी ठेवून शाखा मोठी करण्यासाठी सर्व सरपंचांनी देखील सहकार्य करावे व भविष्यात आनेवाडी शाखेचा नावलौकिक वाढला पाहिजे असे काम सर्वांनी करावे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर साबळे म्हणाले, संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा करणे हे आमचे प्रथम प्राधान्य असून व्यवसायिक, नोकरदार, ठेवीदार यांचा विश्वास संपादन करून लोकांच्या दारी जाऊन संस्थेच्या योजना पोहोचवीण्याचे काम चांगल्या प्रकारे करून शाखेचा विस्तार वाढविण्यासाठी आमच्यासह कर्मचारी देखील प्रयत्नशील राहतील. ही अत्यंत कमी कालावधीत शाखा सुरु केली असून आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने सचिन सोनावणे, सुहास भोसले, दुर्गा भिसे, नामदेव क्षीरसागर, अनिता गायकवाड, धनंजय गोरे, माजी अध्यक्ष हणमंतराव साबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योस्त्ना साळुंखे यांनी तर सूत्रसंचालन व आभार युवराज शिंदे यांनी मानले.
