महत्त्वाच्या बातम्या

बालसंस्कार उपासना केंद्राचा तेरावा वर्धापन दिन संपन्न 

 

   बाल संस्कारातूनच आदर्श व्यक्तिमत्व घडतात असे प्रतिपादन माण तालुका डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष एकनाथ वाघमोडे यांनी केले. माण तालुक्यातील क वर्ग तीर्थक्षेत्र असलेल्या नरवणेमध्ये महाराष्ट्र व्यसनमुक्त संघाचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेने बाल संस्कार उपासना केंद्राच्या तेराव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नरवणे गावातील भजनी मंडळी, नागरिक आणि बालसंस्कार शिबीरातील विद्यार्थी उपस्थित होते.

      पुढे बोलताना वाघमोडे म्हणाले, बालकांवर योग्य वेळी झालेले संस्कार त्यांना भविष्यात बनण्यास मदत करतात. त्यासाठी बालवयात सर्व महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपले घर निर्व्यसनी राखण्यासाठी प्रबोधन करण्याचे आवाहन करून बाल संस्कार शिबिराचे कौतुक केले.यावेळी सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षिसांचे वितरण करण्यात आले. देशभक्तीपर गीताने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मनोहर काटकर यांनी सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक करून आभार प्रकट केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!