महत्त्वाच्या बातम्या

पीडित पुरुष आयोग स्थापनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी- सौ.प्रतिभा शेलार  संस्थापिका : महालक्ष्मी आधार फाउंडेशन

      महाराष्ट्रातील सर्व पिडीत पुरुष वर्गासाठी पीडित पुरुष आयोग स्थापन करावे यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहखाते विभाग, 36 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व 36 जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांना निवेदना मार्फत पत्र पोस्टाने व मेलद्वारे पाठवण्यात आले आहे. गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व शासकीय सर्व पोलीस विभागाला महाराष्ट्रातील सर्व पीडीत पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावे असे पत्र दिले होते पण अजूनही पीडित पुरुष आयोग स्थापन करण्यासाठी ही उपाय योजना महाराष्ट्र शासनाकडून झालेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पत्र पाठवण्यात आले आहे
     महाराष्ट्रामध्ये अत्याचार विरोधात ज्याप्रमाणे महिला आयोग आहे. त्याचप्रमाणे पुरुष पीडित असणाऱ्या पुरुष वर्गासाठी पुरुष आयोग याची स्थापना करावी. आपल्या महाराष्ट्र मध्ये महिलांना आरक्षण असल्यामुळे आणि महिलांच्या बाजूने कायदा असल्यामुळे काही विकृत मानसिकतेच्या महिला त्याचा गैरफायदा घेत आहेत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने पीडित पुरुष आयोगाची स्थापना करावी जेणेकरून पुरुष वर्ग आणि महिला वर्ग यांच्यात विनाकारण भांडने व अत्याचार होणार नाहीत. तसेच घरगुती जी भांडण असतात तेही बंद होतील व इतर काही महिला पुरुषांवर अत्याचार करतात खोटे विनयभंग खोटे बलात्कार सांगून गुन्हे दाखल करतात यावर आळा बसेल. पुरुष वर्ग यांना न्याय व हक्क मिळण्यास थोडी मदत होईल त्यामुळे महाराष्ट्र शासनाला माझी ही विनंती आहे की त्यांनी पुरुष वर्गासाठी महाराष्ट्रामध्ये पुरुष आयोगाची स्थापना करावी. 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!