खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग – मा.श्री.रविराज देसाई
शालेय जीवनात खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी बौद्धिक ज्ञानाबरोबर आपली शारिरीक वाढ होण्यासाठी खेळाला महत्व दिले पाहिजे. खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाहीत. असे मत मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई यांनी व्यक्त केले,
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयातील कु.आर्यन पाटील, कु.विघ्नेश पाटील, कु.जीवन शेजवळ, कु.योगेश शेजवळ या विद्यार्थ्यांनी 14 वर्षाखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 3 जानेवारी ला नाशिक या ठिकाणी पार पडली होती. यामध्ये विद्यालयातील विद्यार्थी सातारा क्रिकेट संघ (ब)यामध्ये जीवन शेजवळ व आर्यन पाटील या दोन विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर झाल्या बद्दल त्यांचे महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार श्री.शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई, कारखान्याचे चेअरमन मा.श्री.यशराज देसाई दादा, युवा नेते जयराज देसाई दादा , आदित्यराज देसाई दादा, बाळासाहेब फौंडेशनचे सचिव श्री.एन.एस.कुंभार सर , संस्थचे सर्व संचालकतसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी.एल.केंडे सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी विशेष प्रावीण्य मिळविवेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
