अल्पवयीन मुलीला धमकवणाऱ्या आरोपीस पोलिसांकडून 24 तासात अटक
पुण्यात लोणी काळभोर पोलिसांनी 24 तासाच्या आत फरार असलेल्या आरोपीला अटक केली. 19 वर्षे तरुणाला पोक्सो कायद्यांतर्गत अटक केली आहे. आरोपी साहिल मेहबूब शेख (वय 19 वर्ष राहणार गोपाळवाडी , ता. हवेली जि. पुणे) अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो तयार करून तिला मोबाईल वरून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपीने एका मुलीशी मैत्री करून तिचे अश्लील फोटो काढले होते आणि तिला धमकावत होता. पिडीतेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता 24 तासातच पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले.
आरोपीने सापडू नये म्हणून आपल्या मोबाईल बंद ठेवला होता व सतत ठिकाणी बदलत होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचे ठिकाण शोधून काढले आणि त्याला 23 जानेवारी 2025 रोजी रात्री अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस स्टेशन श्री राजेंद्र पन्हाळे, पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी, पोलीस अंमलदार आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने सदरची कामगिरी करण्यात आली.
