राजकारणाच्या आखाड्यात विनेश फोगाट चा विजय-
हरियाणा – माजी भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला. हरियाणा विधानसभा निवडणुक 2024 मध्ये काँग्रेस पक्षाने जिंद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून विनेश फोगाट ला उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत विनेशने आपल्या प्रतिस्पर्धींचा पराभव केला. विनेशच्या विजयाचा जल्लोष सर्वांनी साजरा केला.
विनेशचे सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले की, देशाची मुलगी विनेश फोगाट विजयी झाल्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन. तिची ही लढाई फक्त 3 – 4 उमेदवारांविरुद्ध किंवा कोणत्या पक्षाची नव्हती तर देशातील सर्वात मजबूत अत्याचारी शक्तिंविरुद्ध होती. विनेश फोगाटने 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात भाग घेतला होता. तिने चमकदार कामगिरी दाखवत अंतिम फेरीत देखील आपले स्थान निश्चित केले होते परंतु अंतिम सामन्या आधी तिचे वजन 100 ग्रॅम ने वाढल्या कारणाने तिला अपात्र घोषित केले गेले.परंतु तिने राजकारणातील कुस्ती जिंकली.
विनेश फोगाटला एकूण 65,080 मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार योगेश कुमार यांना 59,065 मते मिळाली तसेच नॅशनल लोक दलाचे उमेदवार सुरेंदर लाथेर यांना 10,158 मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले. विनेशने आपल्या पहिल्याच निवडणुकीत 6015 मतांनी विजय प्राप्त केला.
