आईच बनली मुलासाठी कर्दनकाळ
आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना नुकतीच कराड तालुक्यातील वराडे गावातून समोर आली आहे. नऊ महिने पोटात सांभाळ करून आई आपल्या अनंत प्रसूती वेदना सहन करून बाळाला जन्म देते. आणि तिचाही तो पुनर्जन्म असतो. अगदी स्वतःचा जीव देण्याची वेळ आली तर ती पुढे मागे पाहत नाही अशी करुणा प्रेम आणि वात्सल्याची मूर्ती म्हणून आईची प्रतिमा असते. मात्र या प्रतीमेच्या अगदी उलट आपल्या अनैतिक प्रेमसंबंधास अडथळा होत असलेल्या आपल्या चोवीस वर्षीय मुलाचा खून करण्याचा कट खुद्द आईनेच आपल्या प्रियकरासोबत रचला आणि तो प्रत्यक्षात अमलातही आणला.
मात्र सातारा पोलिसांच्या तत्परतेने त्या युवकाचे
प्राण वाचले असून पोलिसांनी कोणताही धागेदोरे नसताना या प्रकरणाचा छडा लावत चार जणांना ताब्यात घेत त्यांना जाणीवपूर्वक कट रचून खून करण्याचा गुन्ह्यात अटक केली.या बाबत सविस्तर माहिती अशी की, 29 जानेवारी रोजी कराड तालुक्यातील वराडे गावाच्या हद्दीत एक अनोळखी युवक अत्यंत जखमी आणि अंत्यवस्थेत आढळून आला. याबाबत वराडे पोलीस पाटलांनी तळबीड पोलिसात खबर दिली.
माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे स पो नी किरण भोसले हे आपल्या पथकासंवेत घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी एक अनोळखी युवक जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. क्षणिक विलंब न करता पोलिसांनी तासवडे नाक्यावरील रुग्णवाहिका बोलावून जबर जखमी आणि बेशुद्ध युवकास कराड कॉटेज रुग्णालयात नेले. मात्र डोक्यावर अत्यंत जबर जखम असल्याने डॉक्टरांनी त्यास कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले पोलिसांनी तातडीने युवकास कृष्णा मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेले व उपचार सुरू केले.
दरम्यान पोलीसांची या कामी विविध पथके तयार करून तपास सुरू केला. टेक्निकल ॲनालिसिस करून युवकाची प्रोफाइल हस्तगत केली.सदरच्या जखमी युवकाचे नाव प्रशांत महादेव शेडगे वय 24 राहणार शिवडे ता.कराड असल्याचे समोर आले. कराड उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP अमोल ठाकूर यांनी या कामी तपासाची चक्रे अधिक गतिमान करत
पुणे येथील या हल्ल्या संदर्भात तिघा युवकाला ताब्यात घेऊन माहिती घेतली.
या संपूर्ण घटने मागे जखमी युवकाची सख्खी आईच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जखमी युवकाची आई शोभा महादेव शेडगे वय 38 ,रा. काटेपुरम चौक पिंपळे गुरव, सांगवी ता .हवेली जि पुणे सध्या ( रा. शिवडे ता कराड) व जयेंद्र गोरख जावळे वय 40 रा.
काटेपुरम चौक पिंपळ गुरव सांगवी ता .हवेली जि. पुणे
यांचे अनैतिक संबंध होते.
जखमी युवक हा आईस खूप त्रास देत होता या कारणाने आई शोभा शेडगे हिने प्रियकर जयेंद्र जावळे सोबत मुलगा प्रशांत याचा कायमचा काटा काढायचा असे ठरविले या कामी आरोपी जयेंद्र याने आपले मित्र
सिदधार्थ विलास वान्हळे वय 20 वर्ष मुळ रा. मातोश्रीनगर, वांगीरोड परभणी जि. परभणी सध्या रा. राजयोग गार्डन, वाकड चौक, ता. हवेली जि. पुणे व अकबर मेहबुबशेख वय 25 रा. निकाळजे वस्ती, सुर्यमुखी गणपती मेंदीराजवळ, बाणेर गांव, बालेवाडी स्टेडीयमजवळ ता.हवेली जि. पुणे यांची मदत घेत रिक्षाने कराड गाठले. या ठिकाणी शोभा हिच्या मदतीने आरोपी यांनी जखमी युवकास रिक्षात बसवून शेवडे गावाबाहेर नेले व उंब्रज गाठले तेथे त्यांनी जखमी युवकास दारू पाजून वराडे गावाच्या हद्दीत शेतात नेऊन त्यास दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न करत जखमी केले.
जखमी युवक हा दारूच्या नशेत असल्याने कोणताच प्रतिकार करू शकला नाही आणि डोक्यावर जबर मार लागल्याने बेशुद्ध पडला.आरोपींना आता तो जगणार नाही याची खात्री वाटल्याने त्यांनी युवकास तिथेच टाकून रिक्षाने पुन्हा पुणे गाठले मात्र वराडे पोलीस पाटलांनी वेळेत दिलेली खबर आणि तळबीड पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता युवकास वेळेत दिलेली वैद्यकीय मदत यामुळे युवकाचे प्राण वाचले.
कराड DYSP अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीड स पो नी किरण भोसले आणि त्यांच्या पथकाने टेक्निकल तपास करून अवघ्या 24 तासाच्या आत खुनाचा कट रचणाऱ्या जन्मदात्या आईला व तिच्या प्रियकर आणि साथीदारांना ताब्यात घेत अटक केली.
सदर गु्हयाचे कामगीरीवाबत मा. पोलीस अधीक्षक सातारा मा. थ्री. समीर शेख सो, मा.अपर
पोलीस अधीक्षक सातारा मा. श्रीमती वैशाली कडूकर मॅडम, यांनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी
कराड श्र.अमोल ठाकूर यांचे तसेच पो.नि. महेंद्र जगताप, पो.नि. अरण देवकर, स.पो.नि. किण भोसले,
स.पो.नि. अशोक भापकर, स.पो.नि. रविंद्र भोरे, स.पो.नि. अमित बाबर, स.पो.नि रोहीत फा्णं, पो.उ.नि.
सत्यवान पाटील, विश्वास शिंगाडे, अझरुदीन शेख, दिपक वागवे, श्रेणी पो.उ.नि. दिनकर काळे, नरेंद्र
मोरे, सहा. फौजदार नागेश भरते, आनंदा रजपुत, सतोष सपाटे, पोलीस हवालदार गोरखनाथ साळुंखे,
आप्पा ओंबासे, प्रविण पवार, योगेश भोसले, अनिल स्वामी, म.पो.हवा विनया वाघमारे, मेघा साळुंखे,
पोना. दिपक कोळी, संदेश दिकीत, पो कॉ. निलेश विभुते, अभय मोंरे, प्रविण फडतरे, गणेश राठोड,
ऋषीकेश वेल्हाळ, आनंदा जाधव, दिवीजय सांडे, मयुर थोरात, मयुर देशमुख, संग्राम पाटील, प्रविण
गायकवाड, महीला पो.कॉ. शितल मोहीते, अबिनी थोरबडे, सोनाली पिसाळ, कृष्णा हॉस्पीटल येथे
ड्युटीस असणारे पोलिस हवालदार यांनी राजेंद्र देशमुख यांचे कौतुक व अभिनंदन केले.
