महत्त्वाच्या बातम्या

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जांब येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा संपन्न

   विद्यार्थ्यांनी आपली आवड लक्षात घेवून दहावी नंतरची करिअरची दिशा निश्‍चित करावी. ते करताना स्वत:च्या मनाचा आवाज ऐकावा. तसे झाल्यास जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असा विश्‍वास अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विश्‍वस्त विनोद कुलकर्णी यांनी जांब, ता. वाई येथे बोलताना व्यक्‍त केला.

     कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या भाग शाळा जांब येथे दहावीतील विद्यार्थ्यांच्या शुभचिंतन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून कुलकर्णी बोलत होेते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य भैय्यासाहेब जाधवराव होते. कुलकर्णी पुढे म्हणाले, आताची पिढी खूप हुशार आहे. त्यांची मेहनत करण्याचीही क्षमता आहे. त्याला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळणे आवश्यक असून रयत शिक्षण संस्था त्या दिशेने करत असलेले कार्य मोलाचे आहे. त्या मार्गदर्शनाच्या बळावर विद्यार्थ्यांनी यशस्वी होईपर्यंत अफाट परिश्रम करावेत. आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यावर उभे असणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यासाठी सदैव जागरुक व सज्ज रहावे, असेही आवाहन त्यांनी केले. 
      यावेळी बोलताना भैय्यासाहेब जाधवराव यांनी जांब शाळेच्या उभारणीत योगदान दिलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्‍त करुन या ठिकाणी सर्व सोयी सुविधा देण्यात नेहमीच जागरुक राहिल्याचे सांगून जांबच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत संपूर्ण भुईंज केंद्रात राखलेला अग्रक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी पाचवी ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास निवृत्त न्यायाधिश बापूसाहेब कदम, सौ. हेमलता कदम, उद्योजिका मृणालिणी बाबर, स्कूल कमिटीचे सदस्य उत्तमराव भोसले, ए. डी. शिंदे, संतोश शिंदे, सुंदर गायकवाड, वसंत गायकवाड, संतोष रोडे, दादासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!