पुणे

आळंदीतील ७५ वर्षीय महिलेच्या घरात घरफोडी; दीड लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

ही बातमी मित्रांसोबत शेअर करा:

आळंदी : हवेली तालुक्यातील आळंदी परिसरात अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत १ लाख ५० हजार रुपये रोख आणि सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याप्रकरणी आळंदी येथील शीतलादेवी नगर, अष्टविनायक डेव्हलपर्स परिसरात राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी झाली.

फिर्यादी यांच्या घराचा मुख्य दरवाजा कुलूप लावून बंद असताना अज्ञात चोरट्याने कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातून १ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक योगेश पैठणे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

आळंदी परिसरात घरफोडीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

error: Content is protected !!