महत्त्वाच्या बातम्या

EVM विरोधात इंडिया आघाडी सुप्रीम कोर्टात जाणार : सुप्रिया सुळे

     सरकार स्थापन करायला एवढा उशीर हे दुर्दैव आहे. सरकार स्थापन करायला दहा दिवस लागले. याच मालही आश्चर्य वाटतं की सरकार स्थापनेला एवढा वेळ का लागला, असं म्हणत सुप्रिया सुळे यांना महायुती सरकारला चिमटा काढला.इंडिआ आघाडीने EVM विरोधात एल्गार उगारलाय. ईव्हीएमविरोधातील लढा आता थेट सुप्रीम कोर्टात लढला जाणार आहे. त्यासंदर्भात माहिती देताना सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत महायुतीच्या सरकारवर टीका केली. ईव्हीएमच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असून त्यासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक झाली. त्या मुद्द्यावर चर्चा झाली आहे.
       काँग्रेस पक्ष यावर काम करत आले आहे. तसेच त्याबाबत अनेक लोकांकडून आम्ही मार्गदर्शन घेणार आहोत. जनतेच्या मनात त्याविषयी अस्वस्थता आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा आवाज ऐकणं हे आमचं काम आहे. सोमवारी त्याविषयी निर्णय घेतला जाईल अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महायुतीनं तब्बल 231 जागा जिंकल्या. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 41 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला. महायुतीला इतकं बहुमत मिळून ही सत्ता स्थापनेला वेळ लागला होता.

      मंत्रिपदावरून महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू झाला होता. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला कोपरखळी मारली. सरकार स्थापन करायला एवढा उशीर हे दुर्दैव आहे. १० दिवस लागले सरकार स्थापन करायला. मालही आश्चर्य वाटतं की सरकार स्थापनेला एवढा वेळ का लागला. महाराष्ट्राने बहुमत दिलं असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार मिळायला हवं, असं त्या म्हणाल्या.
मरकटवाडीमध्ये झालेल्या मतदानावेळी ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप आहे. त्यावरून मरकटवाडी येथे बॅलेटपेपरवर मतदान घेण्यासाठी शरद पवार गट आग्रही आहे. तेथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचंही ठरवलं होतं. मात्र प्रशासनाने त्याला परवानगी दिली नाही.तसेच निवडणूक आयोगाने त्यावर कारवाईदेखील केली. त्यावरून बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगाला एवढीच मागणी आहे की समाजात एवढी आस्वस्थता असेल तर एवढीच मागणी आहे की मागणी मान्य करावी.

जगातील अनेक देश बॅलेटवर शिफ्ट झाले आहेत. निवडणुका पारदर्शक झाल्या पाहिजेत. बॅलेटवर या कुठलीही अडचण होणार नाही, जगात बदल होत असेल तर आपण देखिल करायला हवा. तर मतदान घेणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल झाल्या प्रकरणीही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. मरकटवाडीमधील लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत ही दडपशही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!