आनेवाडी टोल नाका येथे तब्बल 34 लाखांचे सोने पकडले
पुणे बेंगलोर महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यावर तब्बल 34 लाखांचे सोने पकडले आहे. सातारा शहरापासून 15 किलो मीटरवर असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्यावरुन रोज लाखो वाहनांची वाहतुक होत असते.ऐन दिवाळीच्या मोक्यावर सुमारे 34 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशीच एक घटना सातारा पुणे रोडवर शुक्रवारी घडली. नाकाबंदी असताना 38 कोटींचे सोने भरलेले ट्रक पोलिसांनी पकडला. सातारा आनेवाडी येथील प्रकरणाची चौकशी सुरू असून सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांच्या पथकाकडून पुढील तपास सुरू आहे.
