महत्त्वाच्या बातम्या

कोणत्याही क्लास शिवाय पोलीस दलात भरती होऊन आपल्या आई वडिलांची केली इच्छा पुर्ण 

     आई वडिलांचे स्वप्न होते आणि ते स्वप्न पुर्ण करणे हा एकच ध्यास समोर ठेवून अत्यंत गरीब अशा मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील किरण गायकवाड या तरुणाने रात्रदिवस कोणतेही खाजगी प्रशिक्षण न घेता मुबंई पोलीस दलात भरती होऊन काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या आई वडिलांची स्वप्नपूर्ती केली.
        मोरघर ता.जावळी येथील मोलमजुरीवर पेंटिंग काम करणारे कालिदास गायकवाड व रेखा गायकवाड यांना किरण व हेमंत ही दोन मुले तुटपुंजी जमीन डोंगर भाग असल्याने त्यात उत्पन्न देखील मिळेल अशी परिस्थिती नाही. त्यामुळे वडील मोलमजुरीवर पेंटिंग व आई शेतीमध्ये मजुरी करून  आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना आपल्या आई वडिलांची कष्ट करून घर चालविताना होणारी कसरत ही दोन्ही मुले पाहत होती. अशा परिस्थितीतून देखील आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे त्यासाठी आपली ओढाताण झाली तरी चालेल पण मुलांना काहीही कमी पडू द्यायचे नाही ही जिद्द आई वडिलांची होती. आपल्या मुलाने  पोलीस दलात भरती व्हावे ही मनोमन इच्छा व गरीब परिस्थिती असतानाही मग शा आई वडिलांसाठी त्यांच्या स्वप्नासाठी किरणने जिद्दीने तयारी करत  मेहनत घेतली. प्रशिक्षण घेण्यासाठी देखील कोणतीही आर्थिक मदत घरातून मिळणार नव्हती. त्यामुळे स्वतःच दिवस रात्र व्यायाम करून कितीही अडचणी आल्या. एक अपघात झाला त्यामुळे एक महिना विश्रांती घ्यावी लागली होती मात्र सुदैवाणे निवडणूकीमुळे भरती प्रक्रिया पुढे ढककली गेली. अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरी देखील त्या अडचणींना आपले मार्गदर्शक बनवत पोलीस दलात भरती होऊन आजच्या तरुण वर्गाला एक आदर्श घालून दिला आहे.       
       कोणताही क्लास न लावता आपल्या स्वतःच्या हिमतीवर व बळावर व आई वडिलांच्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी दाखविलेली जिद्द खऱ्या अर्थाने या सर्वसामान्य कुटुंबासह सर्व मोरघर गावासाठी अभिमानास्पद ठरली आहे. निलेश भरती झाल्याचे समजताच अख्या गावात फटाके वाजवून मोठा जल्लोष करण्यात आला.  सर्व गावात या कुटुंबाची मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक दारात या आई वडीलांसह या जिद्दी मुलाचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने ठिकाठिकाणी सत्कार करण्यात आले.
      आपला मुलगा भरती झाल्यानंतर आशा प्रकारे झालेले स्वागत पाहून आई वडीलांना मात्र अश्रु अनावर झाले होते. सर्वसामान्य कुटुंबातील या लेकराने पोलीस दलात प्रगती करून  आपल्या आई वडीलांसह कुटुंबाचे व गावाचे नाव उज्वल करावे असा आशीर्वाद या निम्मिताने किरणला देत होते. किरण गायकवाड सर्वांचे आभार व्यक्त करताना म्हणाला अनेकदा मी अपयशी ठरलो मात्र अखेर यशस्वी झालोच. ज्यांनी मला जन्म दिला त्या माता पित्याची स्वप्नपूर्ती केल्याचा व मला पोलीस दलात सेवा बजावन्याची फार मोठी संधी मिळाल्याचा खुप अभिमान आहे. ज्यांनी ज्यांनी मला मदत केली त्या सर्वांचा मी ऋणी आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!