कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ अंतर्गत HPY लसीकरण शिबीराचे उद्घाटन
आज नाटोशी येथे कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ अंतर्गत HPY लसीकरण या शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. HPY लसीकरणामुळे , गर्भाशायाचा कर्करोग यांचे प्रमाण कमी होणार आहे.यानतंर जलतारा शासकीय योजनेचा शुभारंभ केला. या जलतारा योजनेमुळे जमिनीची भुजल पातळी वाढणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच कोयना दौलत डोंगरी महोत्सव २०२५ अंतर्गत दौलतनगर येथे विशेष आरोग्य शिबिर दौलतनगर मरळी येथे आयोजित केले आहे. या आरोग्य शिबिरात आरोग्य रथ, आरोग्य विभागांमार्फत सर्व रोग निदान तपासणी, कर्करोग तपासणी, डोळे तपासणी ही उच्च डॉक्टरकडून डोंगरी व दुर्गम भागातील नागरिकांसाठी हे आरोग्य सेवेचे मोठे योगदान राहणार आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याषनी नागराजन , विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
