वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांची पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी यांनी घेतली सदिच्छा भेट
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री कासम भाई मुलानी यांच्या नेतृत्वाखाली खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुर्वे साहेब यांची आज सदिच्छा भेट घेण्यात आली. प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खारघर शहरातील अनेक अनेक समस्या बाबत पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्याशी चर्चा केली. ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब लबडे यांनी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी उत्सव चौकामध्ये सिग्नल यंत्रणा तसेच पोलीस चौकीचे निर्माण करण्यात यावे असा मुद्दा उपस्थित केला. तसेच सहकार विभाग जिल्हाध्यक्ष महेश राऊत यांनी खारघर शहरातील अनेक समस्या बाबत समस्या मांडल्या. या बैठकी करिता माजी जिल्हा उपाध्यक्ष कासम भाई मुलानी, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब लबडे, सहकार विभाग जिल्हाध्यक्ष महेश राऊत, सुनील सूर्यवंशी, अमित मित्रा, सूरज झा , परमार इत्यादी अनेक पदाधिकारी उपस्थित होते
