जामा मशिदीच्या च्या पाहणी वेळी दगडफेक….पोलिसांकडून जमवावर लाठीचार्ज
उत्तरप्रदेशातील संभळ येथील जामा मशिदीची पाहणी करण्यासाठी डीएमएसपी सह एक टीम आज सकाळी सहा वाजता आली होती. सुट्टीच्या दिवशी एवढ्या पहाटे मशिदीची पाहणी का करत आहेत असा प्रश्न आजूबाजूच्या मुस्लिम समाजातील लोकांनी केला. सर्वेक्षण रोखण्यासाठी लोकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. लोकांचा जमाव एवढा वाढला की पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. तसेच लाठी चार्ज करून जमाव कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परिस्थिती अजून नियंत्रणा बाहेर असून गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांचा अधिक ताफा बोलवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातील जामा मशिदीला श्री हरिहर मंदिराचा दर्जा देण्याबाबत हिंदू पक्षाच्या याचिकेवर 19 नोव्हेंबर रोजी न्यायालयात सुनावणी झाली.हिंदू पक्षाने दावा केला आहे की, संभळ येथील जामा मशीद ही आधी हरिहर मंदिर होते. बाबरच्या कारकीर्दीत 1529 मध्ये त्याचे मशिदी मध्ये रूपांतर झाल्याचे हिंदू पक्षाने म्हटले आहे. मशिदीचे सर्वेक्षण करून या आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. पाच दिवसात दुसऱ्यांदा सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाचे हे पथक रविवारी संभळ येथे दाखल झाले. 26 नोव्हेंबरला हा अहवाल सादर करायचा आहे व 29 रोजी यावर सुनावणी होणार आहे. सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या या टीम मध्ये हिंदू बाजूचे वकील डीएमएसपी एसडीएम यांच्या सह सरकारी वकील हजर होते तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पीएसी आरआरएफ ची टीम आधीच तैनात केली होती. हा खटला दाखल करणाऱ्या फिर्यादींमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वकील हरिशंकर जैन,पर्थ यादव, महंत ऋषिराज गिरी, राकेश कुमार, जीतपाल सिंह यादव, मदनपाल, वेदपाल आणि दीनानाथ यांचा समावेश आहे.
रविवारी मशिदीच्या सर्वेक्षणावरून संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकी मध्ये एसपी चे पीआरओ जखमी झाले आहेत. सकाळी मशिदीचे सर्वेक्षण रोखण्यासाठी लोकांनी हजारोंच्या संख्येत गर्दी केली होती .
