महत्त्वाच्या बातम्या

जावळीतील पुनर्वसन पानसच्या सेंद्रीय परसबागेची निर्मिती पोहचणार सातासमुद्रापार 

सातारा: ग्रामपरी संस्था पाचगणीच्या माध्यमातून आज  पुनर्वसीत  पानस गावात सेंद्रिय परसबाग निर्मितीचा  अभिनव प्रयोग राबवला जात आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यांमधून गावचा  सेंद्रिय परसबागेचे गाव म्हणून सर्वत्र  नावलौकिक होत आहे. परदेशातील नागरिकांनी व शेती तज्ञांनी भेट देऊन कौतुक केले.
       १९७७ साली धोम धरणासाठी  वाई तालुक्यातील पानस या गावचे जावळी तालुक्यात कुडाळनजीक पुनर्वसन झाले. यामुळे गावाला शेतीही जेमतेम आहे. यातच ग्रामपरी संस्थेच्या माध्यमातून गावात सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यातून उपलब्ध जागेत प्रत्येक कुटुंबांने परसबाग निर्माण करण्याचा ध्यास घेतला. स्वतःच्या घराजवळ परसबाग तयार झाली. गावातील सर्वांनी आपल्या आरोग्यासाठी सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. याचे महत्त्व व आर्थिक लाभ जाणून आज ३५ कुटुंबांनी स्वतः परसबाग तयार करून यात पिकवलेल्या भाजीपाला आहारात वापरात आहेत. यासाठी जीवामृत, दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रशिक्षण घेऊन याचा  प्रत्यक्ष वापर करण्यात येत आहे. 
       पुनर्वसन पानस याठिकाणीच्या पसरबागेची  ग्रामपरी संस्थेच्या माध्यमातून अमेरिका, सिंगापूर, थायलंड, आफ्रिका, युगांडा, इंग्लंड, केनिया, इथोपिया, फ्रान्स सैबेरिया अशा  दहा देशातील ३० परदेशी शेतकरी व शिक्षण तज्ञ यांच्याकडून पाहणी करण्यात आली. भारतीय ग्रामीण लोकजीवन व शिक्षण पद्धती अभ्यास यांचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या  या परदेशी पाहुण्यांनी सेंद्रिय परसबागेचे  उल्लेखनीय  कामकाज पाहून कौतुक केले. यामुळे पुनर्वसन पानसमधील  परसबागेची निर्मिती आता सातासमुद्रापार पोहोचणार आहे. 
          गावातील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, शाळा, अंगणवाडी यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनातून या आरोग्यदायी प्रयोगाची नांदी होत आहे. याकरिता श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट,राजेंद्र कदम,पवित्रा फरांदे,शरद पाकिरे, वनिता चौधरी,सुनंदा चौधरी, विजया पाकीरे ग्रामपंचायत  प्रशासक दिगंबर सुरवसे  ,ग्रामसेवक  सचिन गायकवाड ग्रामपरी संस्थेचे प्रतिनिधी गणेश पुजारी ,सागर भिलारे आदींचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
  आज सेंद्रिय शेतीशिवाय आरोग्याला पर्याय नाही त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कुटुंबापुरते जरी सेंद्रिय पद्धतीने केलेला भाजीपाला याचा वापर सुरू केला तर आरोग्याचा स्तर वाढेल व परिणामी सेंद्रिय शेती हळूहळू महत्व वाढू लागेल.यादृष्टीने पानस गावात अत्यंत छान काम  झाले आहे. यापुढेही ग्रामपरी संस्थेकडून व्यक्ती बदलातून समाज परिवर्तन आणि गाव विकास’ यासाठी आम्ही काम करणार आहे. असे गणेश पुजारी 
समन्वयक ग्रापपरी संस्था, पाचगणी म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!