महत्त्वाच्या बातम्या

महेशराव जाधव यांची स्वछता व आरोग्य सभापतीपदी निवड 

   दहिवडी: नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडीत ‘तुझ्या गळा…. माझ्या गळा’ असेच चित्र दिसले. खेळीमेळीच्या वातावरणात सर्व निवडी बिनविरोध झाल्या. नगरपंचायतीमधील तिन्ही गटांना यात संधी मिळाली. पीठासीन अधिकारी तथा प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी घेण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे व मुख्याधिकारी संदीप घार्गे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते सुरेंद्र मोरे, विरोधी पक्ष नेते धनाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

     यावेळी झालेल्या बिनविरोध निवडीत बांधकाम व नियोजन समिती सभापतीपदी नगरविकास मंत्री जयकुमार गोरे समर्थक भाजपच्या उज्वला पवार यांची निवड झाली. तर सदस्य म्हणून सुरेखा पखाले, विशाल पोळ, वर्षाराणी सावंत व राणी अवघडे यांची निवड करण्यात आली. स्वच्छता व आरोग्य समिती सभापती पदी प्रभाकर देशमुख समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे महेश जाधव यांची निवड झाली. तर सदस्य म्हणून सुरेंद्र मोरे, धनाजी जाधव, रुपेश मोरे व शैलेंद्र खरात यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापती पदी शेखर गोरे गटाच्या सुप्रिया जाधव यांची निवड झाली. तर सदस्य म्हणून मोनिका गुंडगे, निलम जाधव व विजया जाधव यांची निवड झाली. सदर निवडीवेळी सर्व नगरसेवक उपस्थित होते.नुतन पदाधिकाऱ्यांचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख, भाजपचे नेते शेखर गोरे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!