जावळी तालुका भाजपच्या वतीने जयकुमार गोरेंचे आनेवाडी टोल नाक्यावर जल्लोषात स्वागत
भाजपचे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे जावळी तालुका भाजपच्यावतीने आनेवाडी टोल नाक्यावर मोठ्या जल्लोष्यात स्वागत केले. सातारा जिल्ह्याला प्रथमच मंत्रीपदाची मोठी लॉटरी लागली असल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. माणचे जलनायक आमदार आमदार जयकुमार गोरे यांचे जावळी तालुक्याच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना गोरे म्हणाले मला भाजपने दिलेली संधी आहे त्याचे नक्कीच सोने करून सातारा जिल्ह्यच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
याप्रसंगी जावळी तालुका भाजप अध्यक्ष श्रीहरी गोळे, सयाजीराव शिंदे, मेढा नगरपंचायतीचे नगरसेवक विकास देशपांडे, विठ्ठल देशपांडे, संतोष वारागडे, भाजप युवामोर्चा अध्यक्ष अतुल भोसले, डॉ विकास फरांदे,महेश फरांदे, अविनाश फरांदे यांच्यासह जावळी तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
