दूध दरवढीच्या निषेधार्थ रस्त्यावर दूध ओतून आंदोलन
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा नागठाणे नगरीमध्ये महाराष्ट्र शासन विरुद्ध जे दूध आंदोलन सातारा जिल्ह्यामध्ये पेटले आहे त्याचे औचित्य म्हणून नागठाणे नगरीमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने दूध दरवाढीच्या निषेधार्थ जन आंदोलन रस्त्यावर दूध ओतून आक्रोश करण्यात आला.
याप्रसंगी नागठाणे नगरीचे माजी उपसरपंच श्री. घनश्याम ताटे, नागठाणे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री संजय साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय साळुंके, ज्येष्ठ नागरिक एकनाथ साळुंखे, नारायण साळुंखे, अक्षय साळुंखे, सचिन साळुंखे, तसेच श्री अशोक ताटे,श्री जालिंदर साळुंखे ,श्री दिनकर साळुंखे आप्पा, रि. मेजर श्री नलवडे साहेब, सिद्धनाथ दूध संकलनचे श्री युवराज साळुंखे, श्री सचिन केंजळे,श्री संजय पवार, दीपक साळुंखे ,श्री निवृत्ती साळुंखे भाऊ, नवनाथ साळुंखे या शेतकऱ्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
