महत्त्वाच्या बातम्या

दहिवडी भूमी अभिलेखचा भोंगळ कारभार चक्क सोमवारी कर्मचारी गायब 

दहिवडी :  दहिवडी भूमीअभिलेख कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात उशिरा येतात व सोमवारी कामाचा दिवस असूनही नगर भूमापन कार्यालय बंद ठेवतात त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

     माण तालुक्यातून ५० ते ६० किलोमीटर अंतरावरून ग्रामीण भागातून नागरिक सदर कार्यालयात सकाळी ९:४५ वाजण्याच्या अगोदरपासून ठिय्या मांडून ऑफिसच्या बाहेर बसलेले असताना देखील कर्मचारी आणि अधिकारी कधी कधी १०:३० किंवा ११ वाजण्याच्या सुमारास येऊन सामान्य नागरिकांना अरेरावीची भाषा करतात.या आरेरावीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यामुळे अशा मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी चाप कधी बसविणार असा प्रश्न जनतेतून निर्माण झाला आहे.

      जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख सातारा वसंतराव निकम यांच्याशी फोनवरून संपर्क साधून तक्रार केली असता. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत कामचुकार व बेशिस्त कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून आले.

     सोमवारी आणि गुरुवारी नकला मिळतील असे नगर भूमापन कार्यालयाच्या दरवाजावरती लिहले असून. सोमवारी दहिवडीचा आठवडे बाजार असल्यामुळे ग्रामीण भागातून नागरिक येत असतात त्यांची कामे होत नाहीत. मात्र कर्मचारी मोजणीच्या नावाखाली नक्की कुठे असतात असा प्रश्न नागरिकांमधून निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!