मुख्याधिकारी अभिजीत बापट साहेब यांच्या बदनामी विरोधात सातारकरांचे निवेदन
आज जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापटसाहेब यांच्यावर जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या आरोपांविरोधात आणि बदनामीच्या प्रयत्नांविरोधात सातारकरांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सातारा नगरपरिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू असून, मुख्याधिकारी अभिजीत बापटसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शहरात विकासकामे वेगाने सुरू आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहराचा विकास होत आहे.
तथापि, काही लोक जाणीवपूर्वक मुख्याधिकारी बापटसाहेब यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनांचा सातारकरांनी तीव्र निषेध नोंदवला असून, दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, याविरोधात जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर शेकडो नागरिकांनी स्वाक्षऱ्या करून पाठिंबा दर्शविला.
