महत्त्वाच्या बातम्या

दिल्ली स्फोट प्रकरणासंबंधी नवीन अपडेट समोर; 4 जणांना घेतले ताब्यात

दिल्ली येथे झालेल्या कारच्या स्फोट प्रकरणी दोन संशयितांना जम्मू कश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकाचे नाव आमिर व उमर आहे. आमिर हा पुलवाचा रहिवासी आहे. त्यांना जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. ज्या गाडीत स्फोट झाला ती गाडी अमीरने विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. एका टेलिव्हीजन मधील मुलाखतीतून आमिर हा प्लम्बरचे काम करतो तर उमर हा ठेकेदार असल्याचे समजले आहे. 
       दिल्लीतून काही तास आधीच फरीदाबाद येथून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आणि त्यानंतर हा स्फोट झाला. या प्रकरणात 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी डॉ  मुज्जमील याला ताब्यात घेतले आहे. डॉ उमर हा  डॉ. मुजम्मील चा साथीदार आहे. 
डॉ उमर हा फरीबाद येथील छाप्या नंतर फरार होता. 
डॉ आदिल एहमद व मुज्जमील व  उमर हे पुलवामा चे रहिवासी असून स्फोटातील गाडी तारीक एहमद च्या नावावर असून तो देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. गाडी चालवणारा हा डॉ उमर होता असा पोलिसांचा दावा आहे.  आमिर व उमर हे भाऊ असून डॉ उमरचा या प्रकरणाशी काय संबंध आहे  याचा तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!