महत्त्वाच्या बातम्या

देवापूर ग्राम पंचायत तर्फे आढावा बैठक खेळीमेळीत संपन्न 

 

     ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामांना गती देण्यासाठी देवापूर चे नवनिर्वाचीत सरपंच तात्यासाहेब औताडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी उप सरपंच मंगला चव्हाण, ग्राम विकास अधिकारी निकाळजे, मा. सरपंच शहाजी बाबर, मा. सरपंच बाबासाहेब बनसोडे, सर्व ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते. तात्यासाहेब औताडे यांनी यांनी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची संयुक्त आढावा बैठक घेतली. ग्राम पंचायत च्या सभागृहात , ग्रामसेवक, पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा बँक अधिकारी , कृषी सहाय्यक, एम. एस. ई .बी , पशू वैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग, अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह इतर विभागातील प्रतिनिधी उपस्थित होते.

       यावेळी गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन , स्मशानभूमी परिसर स्वच्छता, रस्त्याची कामे मार्गी लावणे आदी. बाहेर गावाहून येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी . रोड रोमियोंचा बंदोबस्त, करण्यासाठी सर्व समावेशक समिती नेमून जिल्हा परिषद शाळा, रयत कॉलेज कडे येणाऱ्या खाजगी बसेस ची पार्किंग व रस्त्या अभावी कोंडी, जिल्हा परिषद शाळेच्या भौतिक सुविधा , फोगिंग मागणी, कचरा कुंड्या मागणी, वीज, कृषी योजना शेवट घटकापर्यंत पोचवणे, पशू वैद्यकीय योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करून, राष्ट्रीय पशू धन अभियान अंतर्गत उद्योजकता विकास अभियान प्रभावी अंमलबजावणी, अंगणवाडी विस्तारीकरण, व सोयी सुविधा यावर सकारात्मक चर्चा करून तोडगा काढण्यात आला.

        यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वय साधून स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या समस्यांवर मार्ग काढुन गावातील विकास कामांना गती देणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!