धुळ्यातून पुण्यात आलेल्या गांजाची तस्करी करणाऱ्यास अटक…32 लाखांचा मुद्देमाल जप्त
राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थ, अवैध दारू, गांजाची तस्करी होत आहे. पुणे शहरात अशाच एका गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणास पकडण्यात आले आहे. हा तरुण धुळे शहरातील शिरूर येथून पुणे शहरात गांजाची तस्करी करण्यासाठी आला होता.त्याच्याकडून 55 किलो गांजा सह 32 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अशा अनेक तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केले आहे.धुळे व मध्य प्रदेश मधून करण्यात येणाऱ्या अवैध दारू, गांजाची तस्करी करणाऱ्यांना पकडण्याची ही पिंपरी चिंचवड पोलिसांची तिसरी वेळ आहे. नूर मोहम्मद गफ्फार पिंजारी (वय 45)( रा. वडाला गाव मदिनानगर ता. जि. नाशिक )असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले होते. त्या दृष्टीने पोलीस उपयुक्त संदीप डोईफोडे यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकातील सहा पोलीस निरीक्षकांची सहा वेगवेगळी पथके तयार केली होती.
पुणे शहरातील दिघी आळंदी परिसरामध्ये रात्री सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व त्यांचे पथक संशयित वाहनांची तपासणी करत होते त्यावेळी पोलीस अंमलदार विजय दौंडकर व गणेश कर्पे यांना आळंदी घाटातून एक मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार दिघीच्या दिशेने जाताना दिसली. गाडीला थांबवुन चौकशी करताना उडवा उडविची उत्तरे मिळाल्याने पोलिसांना संशय आला व गाडीची डिकी तपासल्यावर त्यात ५५ किलो ६९० ग्रॅमगांजा ने भरलेले पोते सापडले. या प्रकरणातील आरोपीकडून 32 लाख 95 हजार पाचशे रुपयांचा गांजा त्याचप्रमाणे मारुती कार दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद पिंजारी यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीस अंमलदार विजय दौंडकर, गणेश कर्पे, जावेद बागसिराज, मयूर वाडकर, निखिल शेटे, रणधीर माने, निखिल वरपे, कपिलेश इगवे, चिंतामण सुपे व तंत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे यांच्या पथकाने केले.
