महत्त्वाच्या बातम्या

पनवेल-वडाळा लोकलमधून पडून महिला गंभीर जखमी

वाशी : पनवेल ते वडाळा लोकलमधून पडून एक अनोळखी महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या सायन हॉस्पिटल, मुंबई येथे उपचार सुरू आहेत.ही घटना 12 मार्च 2025 रोजी रात्री 9:50 च्या सुमारास वाशी व मानखुर्द रेल्वे स्टेशनदरम्यान कि.मी. 27/127 जवळ घडली.

    सदर महिला लोकलमधून पडल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.सदर महिला सध्या बेशुद्ध अवस्थेत असून तिची ओळख पटलेली नाही. तिच्या नातेवाईकांचा किंवा परिचितांचा शोध सुरू आहे.कोणालाही या महिलेबाबत माहिती असल्यास वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा.वाशी लोहमार्ग पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!