पाटणच्या साखर कारखान्यात भीषण आग
पाटण : पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग जवळपास अडीच ते तीन तास सुरू होती.
आग विझवण्यासाठी मरळी सहकारी साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल, जयवंत शुगर आणि कराड नगरपालिकेच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या आगीत कारखान्याच्या स्थापनेवेळी उभारलेलं शेती कार्यालय भस्मसात झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असून, या घटनेमुळे रात्री नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.विशेष म्हणजे, कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात काही दिवसांपूर्वी बॉयलरच्या टेस्टिंगवेळी स्फोट झाला होता. त्यानंतर पाटणमध्येही अशी दुर्घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
