महत्त्वाच्या बातम्या

माथाडी कामगारांचे मार्गदर्शक स्व. अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन

माथाडी कामगारांचे भाग्यविधाते आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ४३ व्या पुण्यतिथी निमित्त माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी माथाडी भवन, नवी मुंबई येथे उपस्थित राहून कै.अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन केले. तसेच उपस्थित तमाम माथाडी कामगार बंधूंना संबोधित केले.

    स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन मराठा समाज आणि माथाडी कामगारांसाठी खर्ची घातले. सातारा जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून त्याचा आम्हाला सदैव अभिमान राहिला. मराठा आरक्षणाचे जनक, माथाडी कामगारांचे भाग्यविधाते स्व.आ.अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ साली याच दिवशी “मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण द्या” व इतर मागणीसाठी लाखो मराठा बांधवांचा मोर्चा विधानभवनावर नेला होता. 

    “जर या मोर्चा मधील मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर उद्याचा सूर्य पाहणार नाही” अशी भीष्मप्रतिज्ञा देखील त्यांनी केली. मराठा समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रतीत करता येणार नाही. त्यांच्याच विचारांवर पाऊल ठेवून मी माथाडी कामगार प्रश्न, मराठा समाज बांधवांच्या आरक्षण मागणीसाठी लढा देत आहे. आपण सर्वांनी देखील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात असताना ही जबाबदारी समर्थपणे पेलली पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!