महत्त्वाच्या बातम्या

पाटण तालुक्यातील तामकणे येथे संत तुकाराम महाराज गाथा व पारायणाचे आयोजन

पाटण: मौजे तामकणे तालुका पाटण जिल्हा सातारा येथे दिनांक 09 मार्च  पासून दि. 16 मार्च  पर्यंत तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने भव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि संत तुकाराम महाराज गाथा व पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत काकड आरती असणार आहे. त्यानंतर  8 ते 11 दरम्यान पूजा होईल.  दुपारी 2 ते 5 या वेळेत  संत तुकाराम गाथा ग्रंथ वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

         सायंकाळी  5 ते 6 वाजेपर्यंत हरिपाठ व संध्याकाळी 6 ते 7 प्रवचन होणार असुन रात्री 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. व नंतर जागर होणार आहे. सप्ताहात ह भ प ज्ञानेश्वर महाराज, सुनील महाराज, नथुराम महाराज, वसंत महाराज,रावजी महाराज,सदानंद महाराज, दादासाहेब महाराज यांची प्रवचने, शंकर महाराज, रमेश महाराज, सुशांत महाराज,तानाजी महाराज,  दादासो महाराज, सर्जेराव महाराज, मिलिंद महाराज या नामांकित कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.

       महिला भजनी मंडळ तामकणे,  रामपूर, अंबावणे, खिवशी, म्हावशीं, पिंपळोशी, कातवडी,घाणव,साखरी, मेंढोशि,सलतेवाडी, मकाईचीवाडी,ताटेवाडी,त्रिपुडी,बीबी, सुरुल, चीतेघर,केरळ तामकणे येथील महिलांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. दिनांक 15 मार्च रोजी  भव्य दिंडी सोहळा होणार आहे. व  16 मार्च रोजी श्री गाथा सांगता आणि ह भ प दादामहाराज पाटणकर यांचे काल्याचे कीर्तन होईल. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संत सेवा भजनी मंडळ, तामकणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!