बँक ऑफ बडोदामध्ये 518 पदांसाठी भरती; अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च
बँक ऑफ बडोदामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक आणि मुख्य व्यवस्थापक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 518 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार 21 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
भरतीची माहिती:
पदाचे नाव: वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
पदसंख्या: 518
शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा: 24 ते 43 वर्षे
अर्ज शुल्क: 600 रुपये
अंदाजे पगार: 64,820 ते 1,20,940 रुपये प्रतिमहिना
नोकरी ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2025
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट: www.bankofbaroda.in
उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भरती संदर्भातील अधिक माहिती घ्यावी.
