बालगृहातील मुला मुलींचा व्यक्तीमत्व विकास कौतुकास्पद –जिल्हाधिकारी संतोष पाटील
सातारा: जिल्हा परिविक्षा आणि अनुरक्षण गृह संचलित मुला मुलींचे बाल निरीक्षणगृह येथील मुला मुलींचा सर्वांगीन विकास हा कौतुकास्पद असून संस्थेमध्ये बालकांसाठी चाललेले सर्व उपक्रम हे वाखाणण्याजोगे आहेत, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले. तसेच मला तुमच्या सोबत वेळ घालवायला नक्की आवडेल मी पुन्हा बालगृह भेटीला येईन असे संतोष पाटील यांनी मुलांना सांगितले.
सातारा येथील मुलामुलींच्या बालगृहामध्ये गणपती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. बालगृहातील संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटनही जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अविनाश पोळ व सचिव प्रदिप साबळे पाटील, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ बालकल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. डॉ. सुचित्रा घोगरे काटकर, सदस्या स्वरुपा पोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता देशमुख, बालगृहाच्या अधीक्षका वर्षा शिंदे संजय साबळे यांच्यासहबालगृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
