‘मतदान’ राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करा…..सहाय्यक बीडीओ प्रकाश बोंबले
राजेंद्र विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, सुशिला शंकरराव गाढवे महाविद्यालय, खंडाळा व स्वीप मतदान जनजागृती अभियान खंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जागृती रॅली व मानवी साखळी आयोजन करण्यात आले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ हणमंत जाधव व प्राचार्य शब्बीर नालबंद यांच्या हस्ते करण्यात आले.
सहाय्यक गटविकास अधिकारी पं.स.खंडाळा प्रकाश बोंबले म्हणाले-“महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता भारतीय निवडणूक आयोगाने मतदान टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कार्यक्रम अंतर्गत प्रबोधन सुरु केले आहे. प्रामुख्याने मतदार जागर रथ गावोगावी फिरत असून शाळा महाविद्यालय सहभागी होत आहेत, आपल्या शैक्षणिक संकुलाने सक्रिय सहभाग घेतला, मतदान राष्ट्रीय कर्तव्यात सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन केले.”
गटशिक्षणाधिकारी गजानन आडे म्हणाले- “मतदान ही प्रत्येक स्त्री पुरुषाची नैतिक जबाबदारी असून कोणीही यापासून वंचित राहणार नाही यासाठी मतदान जनजागृती व्हावी”
ज्ञानेश्वर ढमाळ व सहकाऱ्यांनी रेखाटलेल्या भारत नकाशात वरिष्ठ महाविद्यालय व कनिष्ठ विद्यालय विद्यार्थ्यांनी मानवी साखळी केली होती. प्रास्ताविक व परिचय रतिलाल गावित,आभार धनंजय महामुनी, सूत्रसंचालन प्रा.अमीर इनामदार यांनी केले.यावेळी महिला व बालकल्याण अधिकारी छाया मिठारी, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश यादव,केंद्रप्रमुख सुनिता साबळे,उपप्राचार्य अरुंधती गाढवे, डॉ. प्रतिभा पाटणे शिक्षक,प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रंथपाल हणमंत यादव,बाळू गाढवे, गेनबा चव्हाण,किशोर तळेकर यांनी परिश्रम घेतले.
