महत्त्वाच्या बातम्या

हिंसाचाराच्या भीतीने कॅनेडा मधील ब्रॅम्पटन  त्रिवेणी मंदिरात होणारा “लाईफ सर्टिफिकेट इव्हेंट” रद्द

        कॅनेडा मधील  ब्रॅम्पटन त्रिवेणी मंदिराने रविवारी भारतीय वाणिज्य दुतावासाने रविवारी होणारा जीवन प्रमाणपत्र वितरण समारंभ रद्द केला आहे. 3 नोव्हेंबर 2024 रोजी खलिस्तानी समर्थकांनी ब्रॅम्पटन मधील हिंदू सभा मंदिरातील कॉन्सुलर कॅम्पवर हल्ला केला होता. तेव्हा पासून धमक्यांचे सत्र सुरूच आहे.
      ब्रॅम्पटन त्रिवेणी मंदिर आणि समुदाय केंद्र हे हिंदू समुदाय आणि समविचारी लोकांसाठी एक अध्यात्मिक ठिकाण आहे. जेथे लोक पूजा, कीर्तन, सेवा आणि प्रवचनात सहभागी होण्यासाठी जमतात. 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसक व्यत्ययामुळे भारत आणि कॅनेडा  वर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. त्रिवेणी मंदिरात 17 नोव्हेंबर 2024 रोजी होणारा ‘लाईफ सर्टिफिकेट इव्हेंट’ हा रद्द करण्यात आला आहे. पील प्रादेशिक पोलीसां कडून मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमादरम्यान हिंसक निषेधाच्या अत्यंत उच्च आणि निकटवर्ती धोक्यामुळे हा समारंभ रद्द केला आहे. असे मंदिर अधिकाऱ्यांनी सोमवारी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

      त्रिवेणी मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात भारतीय वंशाच्या हिंदु आणि शीख समुदायच्या लोकांना त्यांच्या जीवन प्रमाणपत्राचे नूतनीकरण करून मिळणार होते ते आता पुढे ढकलण्यात  आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!